रत्नागिरी : राजापूर - लांजाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. नाणार  रिफायनरी प्रकल्पाला विरोध करताना तीव्र आंदोलन केल्याने राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठा रिफायनरी होऊ घातलाय. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठा रिफायनरी होऊ घातलाय. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाही रस्त्यावर उतरली. नाणार प्रकल्प विरोध तीव्र होत असल्याचे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात मनाई आदेश लागू केले होते.


साळवी यांच्याबरोबर पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही अटक केली आहे. आमदार राजन साळवी यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.तसेच हे मनाई आदेश झुगारुन आमदार राजन साळवी यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांनी नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान, आमदार साळवी यांना अटक करण्यात आल्याने परिसरात तणाव आहे.


दरम्यान, नाणार प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला असताना शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाणार हे गाव आंबा उत्पादन, पर्यटन मच्छिमारी करिता संपन्न आहे. या ठिकाणी मोठी रिफायनरी आणण्याच्या सरकारचा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ग्रामस्थ एकवटत आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी १५ गावातील लोक एकत्र येत आता विरोध दर्शवला आहे. 


तर दुसरीकडे या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतलेय. प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा दिलाय. त्यामुळे शिवसेनेनंतर मनसेनेही या वादात उडी घेतलेय. तसेच काँग्रेसनेही या प्रकल्पाला विरोध केलाय.