रत्नागिरी : नाणारमधील प्रस्तावित रिफायनरीचा वाद आता चांगलाच पेटलाय. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आलीय. 


का केली अटक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अध्यक्ष अशोक वालम यांना पत्नीसह अटक त्यांच्या पडवे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. नाटे पोलिसांनी ही अटक केलीय. मनाई असताना सभा घेतली म्हणून जमावबंदीचं उल्लंघन आणि मारहाण असे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेत. त्यामुळे राजापुरात तणावाचं वातावरण आहे.


काय आहे प्रकरण?


नाणार रिफायनरी प्रल्कल्पविरोधी बैठकीत एका व्यक्तीला ग्रामस्थांकडून चोप देण्यात आला आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबई यांनी राजापूरच्या कुंभवडे हायस्कूलमध्ये ही बैठक आयोजीत केली होती. दरम्यान चोप मिळालेला व्यक्ती दलाल असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय. यावेळी त्या व्यक्तीविरुद्ध दादागिरीचा प्रयत्न करण्यात आला असाही आरोप करण्यात येतोय. दादागिरी केल्यामुळे कुंभवडे येथील महिलांनी या व्यक्तीला मारहाण केलीय अशीही माहिती मिळतेय.