नांदेड विमानतळावर चार्टर्ड विमान धावपट्टीवरुन घसरलं
नांदेड विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान धापट्टीवरुन घसरलं आहे.
नांदेड : नांदेड विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान धापट्टीवरुन घसरलं आहे. सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. काल रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. ब्रेन डेड झालेल्या एका तरुणाचे अवयव नेण्यासाठी मुंबईहून नांदेडला एक एअर अंब्युलेन्स आणि एक चार्टर्ड विमान आलं होतं.
रात्री नांदेड मध्ये पाऊस सुरु होता. या पावसात एअर अंब्युलेन्स सुखरूप उतरले. पण लँडिंग करतांना दूसरे चार्टर्ड विमान धावपट्टीवरुन खाली घसरलं. धावपट्टीच्या बाजूच्या चिखलात विमान रूतलं. अपघात घडताच विमानतळावरील कर्मचारी अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. या विमानात असलेले काही डॉक्टर, पायललट, को पायलट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या अपघातामुळे दोन्ही विमानांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे ग्रीन ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव नेता आले नाहीत. दरम्यान या अपघाताबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अधिकृत माहीती दिली जात नाही. दरम्यान या घटनेनंतर नांदेड मुंबई-नांदेड, हैद्राबाद-नांदेड चंडीगड नांदेड दिल्ली या चार विमानसेवा आज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.