सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड: पोटच्या मुलीची निर्घृण हत्या करून आई-वडिलांनी मृतदेह (Honor Killing In Nanded)  जाळल्याची धक्कादायक घटना मराठवाड्यातील (Marathwada news) नांदेड (nanded crime) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. लिंबगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे एका कुटुंबानेच मुलीची हत्या (Nanded Murder) केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह शेतात जाळून टाकला. गावात बातमी पसरल्यानंतर पोलिसांनी (Nanded Police) घटनस्थळी पोहोचत आरोपी आई-वडिलांना अटक केली. मृत तरुणी ही बीएचएमएसच्या (BHMS) तिसऱ्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड (Nanded News) जिल्ह्यातील महिपाल पिंपरी इथं हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे आई-वडील, दोन भाऊ आणि मामा अशा पाच जणांना अटक केली आहे. मृत मुलगी बीएचएमएसमध्ये (BAMS) तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वीच दुसरीकडे तिचे लग्न ठरवले होते. मात्र आठ दिवसापूर्वी तिचे लग्न मोडले. लग्न मोडल्याने गावात बदनामी होत असल्याचे म्हणत कुटुंबियांना राग अनावर झाला.


रविवारी कुटुंबियांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गुपचूप मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. यानंतर मृतदेहाची राख बाजूच्या ओढ्यात टाकून दिली. तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याने गावात चर्चा सुरु झाली. यानंतर कुटुंबियांनीच मुलीला संपवल्याची माहिती गावात पसरली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला. चौकशी केल्यानंतर कुटुंबियांनीच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"मुलीला तिच्या कुटुंबियांनीच मारून टाकलं किंवा काही बरं वाईट केल्याची चर्चा गावात होती. याबाबत बातमीदाराने माहिती दिल्यानंतर त्याची शाहनिशा करण्यात आली. या मुलीचे दुसरीकडे लग्न जुळले होते मात्र तिचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरुन घरच्यांना राग आला आणि त्यांनी मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवर तपास सुरु असून आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे. यामध्ये पाच आरोपींनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे," असे लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली आहे.