नांदेड : बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. टू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरु केली जात आहे.


उडान योजनेअंतर्गत विमानसेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजनेअंतर्गत या विमानसेवेची घोषणा केली होती. मात्र ही सेवा अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होती. नांदेड येथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध असेल. 


प्रसिद्ध गुरुद्वारा दर्शनासाठी सेवा


पहिल्या मुंबई-नांदेड विमानाने अभिनेता जितेंद्र, दिग्दर्शक राकेश रोशन, शक्ती कपूर, आदित्य पांचोली नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी येणार आहेत. नांदेडकरांना यापूर्वी विमानसेवेसाठी औरंगाबादला जावं लागत होतं. 


प्रसिद्ध गुरुद्वारा दर्शनासाठी देशभरातून भाविक नांदेडला येतात. या विमानसेवेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.