नांदेड महापौरपदी शिला भवरे तर उपमहापौरपदी विनय पाटील
महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शिला भवरे तर उपमहापौरपदी काँग्रेसचे विनय गिरडे पाटील यांची निवड झाली.
नांदेड : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शिला भवरे तर उपमहापौरपदी काँग्रेसचे विनय गिरडे पाटील यांची निवड झाली.
८१ पैकी तब्बल ७३ जागा जिंकुन काँग्रेसने नांदेड महापालिकेत प्रंचड बहूमत मिळ्वले होते. महापौर शिला भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे पाटील या दोघांना प्रत्येकी काँग्रेसची ७३ आणि १ अपक्ष अशी ७४ मते मिळाली.
६ आगा असलेल्या भाजपाने निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. तब्ब्ल ६८ मतांनी भाजपा उमेदवारांचा पराभव झाला. सेनेचा एकच नगरसेवक आहे .या नगरसेवकाने भाजपा सोबत न जाता तठस्थ राहणं पसंत केले.
भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना सहा - सहा मते मिळाली. निवड प्रक्रियेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महापालिकेत येऊन नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले.