नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेच्या 81 जागांसाठी सरासरी 60 टक्के मतदान झालं. 578 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेससमोर भाजपनं कडवं आव्हान निर्माण केलं. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रणमैदानात उतरुन चव्हाणांना आव्हान दिलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांवर टीका करत नांदेडवासियांना विकासाचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही नांदेडमध्ये सभा झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत खरी लढत ही काँग्रेस-भाजप आणि शिवसेनेत होते. 


एमआयएम फॅक्टरचा किती फरक पडतो हेसुद्धा निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र नांदेडचा बालेकिल्ला राखण्यात अशोक चव्हाण यशस्वी होतात का याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्यात.