नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन
आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
नांदेड : आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
जुन्या नांदेडमध्ये हतई परिसरात सय्यद मोईन यांनी मतदान केलं. मोईन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाद होऊन काँग्रेस कार्यकर्त्यासोबत मोईन यांची मारामारी झाली होती. त्याच प्रकरणात मोईन यांना अटक करण्यात आली आहे.
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड महापालिकेसाठी आज मतदान होतंय. निवडणूक आयोगाची मतदानासाठी जय्यत तयारी केलीये. महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरातल्या ५५० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडत आहे.