सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्यालाही सध्या बाहेरचं खाणं जीवावर आलं आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये (Nanded News) घडल्याचा पाहायला मिळाला आहे. येथे सलग तीन दिवस गावातील सव्वाशे जणांना आजार, जुलाब आणि उलट्यांचा (Dysentry) त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा पाण्यातील आणि अन्नातील भेसळयुक्त पदार्थांमुळे अनेकजणांना फूड पॉझनिंगसारखे प्रकारही सतावत आहेत. आता या घटनेनं पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ माजवली आहे. (nanded news biloli villagers faces stomach infection from food admitted to hospital)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच गावातील सव्वाशे नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदेड जिल्हयातील बीलोली तालुक्यातील शिंपाळा गावात तीन दिवसात सव्वाशेजन आजारी पडले. तीन दिवसापुर्वी गावातील तब्बल 46 जणांना जुलाब, उलट्या सूरु झाल्या. त्यांना बिलोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर दुसऱ्या दिवशी 67 आणि आज शुक्रवारी पुन्हा 14 जणांना त्रास सुरू झाला. रुग्णांना सगरोळी, बिलोली आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) हलविण्यात आले आहे. आरोग्य पथक गावात दाखल झाले. लोकांचे वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेत. विषबाधेचा हा प्रकार आहे किंवा साथरोग याची तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे.


नक्की काय घडला प्रकार? 


सध्या गावात उलट्या, जूलाब अशा आजारांची (medical treatment) साथ सुरू झाल्याचे दिसून आले आहे. गावात सव्वाशे पेशंट असून आज पुन्हा 14 पेशंट्सची भर पडली आहे. हे आजार अचानक का वाढले यावर अद्यापही काही ठोस कारण समजले नसून याबद्दल आम्ही तपास घेतो आहोत, असं वैभव रामपुरे, वैद्यकीय अधिकारी, सगरोळी यांनी सांगितले. 


सरपंच काय म्हणाले?


सध्या उलट्या, जुलाबांचा साथीचा रोग गावात पसरला आहे, आधी 46 तर नंतर 67 रूग्ण आढळले होते. त्यांच्यावर चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत. परंतु सध्या परिस्थिती चांगली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते आहे.