सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडच्या (Nanded) देगलूरमध्ये (Deglur) सोमवारी (23 जानेवारी) मध्यरात्री उदगीर रस्त्यावरील हॉटेल तरंगच्या बाजूस असलेल्या घरावर चोरट्यांनी दरोडा (robbery) टाकून घरातील चार लाखाचा ऐवज लुटत एका महिलेची हत्या केली होती. यावेळी आरोपींना घरात असलेल्या वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधले होते. त्यानंतर आरोपींना चंद्रकला श्रीपतराव पाटील (65) या महिलेची हत्या केली होती. दरम्यान, या दरोडा आणि हत्या प्रकरणाचा पोलिसांनी (Deglur Police) शिताफीने छडा लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


 श्रीपतराव रामजी पाटील (90) हे त्यांच्या पत्नीसह शास्त्रीनगरमधील देगलूर येथे राहत होते. सोमवारी रात्री 11.30  सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. त्यानंतर श्रीपतराव आणि चंद्रकला यांचे पाय व तोंड कापडाने बांधून मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकला पाटील यांचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी आरडाओरड करत असल्याने चंद्रकला पाटील यांचा गळा आवळून खून केला होता. आरोपींनी घरातील साडेबारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ७० तोळे चांदीचे वाळे असा एकूण 3 लाख 89 हजार रुपयांचा माल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.


कसा झाला उलघडा?


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. पोलिसांनी देगलूरसह कर्नाटकातील विविध ठिकाणचे 96 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यासह हजारो फेसबुक आयडी तपासून पोलीसांनी या गुन्ह्याचा उलगडा केलाय. देगलूर पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावत विठ्ठल बोवणवाड, बालाजी पंढरी, गौतम शिंदे, शेषेराव बोईनवाड या दरोडेखोरांना अटक केली. मयत वृद्ध महिलेच्या भाच्याने रेकी करून दरोडेखोरांना वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी महिलेच्या भाच्यासह पाच दरोडेखोराना अटक केली.


पोलिसांनी काय सांगितलं?


मयत महिलेच्या नातेवाईकांनी या वृद्ध दाम्पत्याकडे आपल्याला मालमत्ता मिळू शकते असे सांगितले होते. त्यानंतर आरोपींनी कट रचत प्लॅनमध्ये काही जणांना सोबत घेतले. आरोपींना कंत्राटार असल्याचा बनाव करत काम करत असल्याचे दाखवले. यानंतर माहिती गोळा करण्यात आली. रेकी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपींनी गुन्हा केला. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.