नांदेड : केंद्र सरकारच्या चार वर्ष पूर्ती निमित्त मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. त्यामध्ये शेतमालाला दीटपट दाम दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र शेतमालाला रास्त दर मिळत नसल्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे याचा फटका नांदेड मधील भाजपा एका नेत्याला बसला आहे. भाजपचे माजी खासदार   सुभाष वानखेडे यांनी वांग्यानी आपल्या शेतात वांग्याची लागवड केली होती. मात्र त्यांच्या वांग्याला अवघे तीन रुपये किलोचा दर मिळाला. तो दर वाहतूकीसही परवड नसल्यामुळं वानखेडे यांनी चक्क पाच एकर वांग्यावर नांगर फिरवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING