नांदेडमध्ये पोलीस भरतीत असा झाला गैरव्यवहार
मध्ये पोलीस भरतीत झालेल्या गैरव्यवहाराचा छडा लागलाय... नांदेड च्या पोलीस अधिक्षकानी हे प्रकरण उघडकीस आणलय.
नांदेड : मध्ये पोलीस भरतीत झालेल्या गैरव्यवहाराचा छडा लागलाय... नांदेड च्या पोलीस अधिक्षकानी हे प्रकरण उघडकीस आणलय... पाहुयात कसा झाला या रैकेटचा पर्दाफाश.हे आहेत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना... २००७ बॅचचे आयपीएस अधिकारी... अत्यंत हुशारीने करण्यात येणाऱ्या हेराफेरीचा मीना यांनी पर्दाफाश केलाय... नांदेड मध्ये ३१ मार्च २०१८ रोजी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा झाली होती. ओएमआर स्कैनिंग पध्दतीने उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या... सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीला उत्तरपत्रिका तपासनीचे काम देण्यात आले होते... पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी प्रश्नपत्रिका सेट केली होती.. निकाल लागला त्यात 13 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक गुण मिळाले होते... पण 13 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक गुण मिळाल्याने मीना अचंबित झाले.
हेराफेरी उघड
आयपीएस अधिकारी असलेल्या मीना यांनी यूपीएससी च्या विद्यार्थ्यांनाही अवघड जातील असे काही गणिताचे प्रश्न टाकले होते... संशय आल्याने मीना यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले ते विद्यार्थी दीड तासाच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका सोडवन्यात व्यस्त असतांना दिसले नाही. तेंव्हा या विद्यार्थ्यांना एव्हढे गुण कसे मिळाले याचा तपास पोलीसानी केला आणि ओएमआर स्कैनिंग ची हेराफेरी उघड झाली.
शिताफीने भांडाफोड
ओएमआर पध्दतीने पेपर तपासनीचे काम राज्यात साधारणता २०१० पासून सुरु आहे..उत्तरपत्रिकावरील मार्क रीडिंग करुण गुण देणाऱ्या या पध्दतीवर कुणालाही संशय येणार नाही. मात्र पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी अत्यंत शिताफीने याचा भांडाफोड केला आणि हा गैरव्यवहार समोर आला. त्यामुळे चंद्रकिशोर मीना यांच्या कुशाग्र बुद्धीला आणि तपासाला सलामच करावा लागेल.