सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : ग्रामीण भागात भरणाऱ्या प्रत्येत यात्रेचं वेगळं वैशिष्ठ्य असतं.. अशीच एक यात्रा नांदेड जिल्ह्यातील तामसा इथं भरते.. ही यात्रा प्रसिद्ध आहे भाजी-भाकरीच्या पंगतीसाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातल्या तामसा गावात बारा जोतीर्लिंगाची यात्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भावीक या यात्रेला येतात. या यात्रेत मिळणारा प्रसाद या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. एका भल्यामोठ्या कढईत वेगवेगळ्या भाज्या एकत्र शिजवल्या जातात. त्यात कोणताही मसाला टाकला जात नाही. 


पंचक्रोशीतील भावीक या भाजीसोबत खाण्यासाठी भाकऱ्या आणतात. या सगळ्या भाकऱ्या एकत्र करुन भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद दिला जातो.


सर्व जाती धर्माचे भाविक आपापल्या परीने देवाच्या चरणी भाकऱ्यांचं दान करतात. आणि याच दानाला शेवटी प्रसादाचं रुप येतं. हा प्रसादही प्रत्येकण मोठ्या श्रद्धेनं ग्रहण करतो. वर्षांनूवर्षाची ही परंपरा तामसा गावकऱ्यांनी आजही जपली आहे.