नाशिकमधल्या नांदूरमध्यमेश्वरला `रामसर` साइटचा दर्जा
काय आहे रामसर?
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य असलेल्या नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्रातील पहिलं रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आलंय. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवर असलेल्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याला हा दर्जा दिलाचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
पक्ष्यांचे माहेरघर आणि पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला रामसर दर्जा देण्यात आलाय. असा दर्जा मिळणार हे राज्यातील पहिलं रामसर साइट आहे. या दर्जामुळे आता पाळथळ आणि पक्ष्यांच्या संवर्धनाला हातभार लागणार आहे.
गेल्या दहा दशकांपासून या भागात जवळपास स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींसह २०० हून अधिक पक्ष्यांची नोंद आहे. जलाशयात अटर्स, पाम सिव्हेट, फिशिंग मांजर, सळ्या, मुंगूस, लांडगे आणि सापाच्या बऱ्याच प्रजाती तसंच माशांच्या जवळपास ३४ प्रजातींची नोंद झाली आहे. म्हणूनच स्थानिक पक्ष मित्र आणि वनविभागाच्या सहभागाने १९८६ मध्ये वन्यजीव अभयारण्य आणि संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित असलेल्या नंदूर मध्यमेश्वरला ऑगस्ट २०१२ मध्ये प्रथम वेटलँड साइट म्हणून प्रस्तावित केले गेलं.
बुलढाणातल्या लोणार क्रेटर लेकला एक महिन्यामध्ये रामसर साइट म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. नंदूरबरोबरच उत्तर प्रदेशमधील सहा आणि पंजाबमधील तीन ठिकाणांना रामसर साइट म्हणून घोषित केलंय. राज्यातल्या या रामसर संरक्षणामुळे राज्याच्या पर्यावरणीय संतुलनाला हातभार लागेल हे निश्चित.