नव्या कारनं शोरुममध्ये घेतला एकाचा जीव! नंदुरबारमधील विचित्र अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Nadurbar Accident : नंदुरबारमध्ये एका शोरुममध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातात निष्पाप सफाई कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. नवी गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
प्रशांत परदेसी, झी मीडिया, नंदुरबार : एका विचित्र अपघातात (Accident News) कार शोरुमधील कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये (Nandurbar News) घडला आहे. तर या अपघातात कार शोरुमचं मोठं नुकसान झालं आहे. नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाने शोरुम मध्येच गाडी चालवून पाहण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचे समोर आला आहे. मात्र या अपघातात शोरुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दु्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
नंदुरबार शहरातील एका चारचाकी गाडीच्या शोरूममध्ये विचित्र अपघात झाला आहे. शोरूममध्ये गाडी बघण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने शोरूमधेच गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच हा अपघात झाला. या विचित्र अपघातमध्ये एका कर्मचाऱ्याचा जीव गेला आहे. ग्राहकाने गाडी सुरु करताच ती अनियत्रित झाल्याने हा अपघात झाला. गाडी वेगात पुढे गेल्याने समोरच असलेला सफाई कर्मचारी त्याखाली चिरडला गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शोरुममध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी आलेली व्यक्ती गाडी चालू करून पाहत होती. पण अचानक गाडीच्या वेग वाढला आणि तिने समोरील गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला. तर नवीन गाड्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र नवीन गाडी शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी सुरू करून आणि संपूर्ण माहिती न देता गाडी घेण्यास आलेल्या व्यक्तीला स्टेअरिंग हातात कसे दिले असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
साताऱ्यात ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने चार महिलांचा मृत्यू
साताऱ्याच्या कारंडवाडी येथे शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडल्याने चार महिलाचा मृत्यू झालाय. तर या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना निसरड्या रस्त्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. यातील अलका भरत माने (वय 55), अरुणा शंकर साळुंखे (वय 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65),लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) सर्व रहाणार कारंडवाडी, ता. सातारा या जागीच ठार झाल्या यातील एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.