प्रशांत परदेशी, प्रतिनिधी, झी मीडिया, नंदुरबार : देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पहात असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झालीय. त्यात चेतक फेस्टीव्हल नावानं अश्व महोत्सव आता भव्य स्वरुपात आयोजीत करण्यात आलाय. राज्य पर्यटन विकास महामंडळाचंही त्याला पाठबळ लाभलंय.


अश्वांची किंमत लाखोंच्या घरात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मर्सडिज गाड्यांची जी क्रेझ आहे त्यापेक्षा जास्त क्रेश सारंगखेड्याच्या अश्व बाजारातील अश्वांची आहे. लाखोंच्या घरात असलेली अश्वांची किंमत, त्यांचे रुबाब आणि त्यांची निगा राखण्यासाठी तैनात असलेला लवा जमा, हा सारंगखेड्याच्या अश्व बाजाराची आन बान शान आहे.


अश्व बाजाराला 300 वर्षांचा इतिहास


असा  नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा अश्व मेळा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सुरु झाला आहे.  सांरगखेडा या अश्व बाजाराला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा भारताचा सर्वात मोठा अश्व महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये भारतीय वंशाचे अश्व प्रदर्शन, अश्व दौड आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच विविध सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


महोत्सव आंतरराष्ट्रीय पटलावर न्यायचा प्रयत्न


यावर्षी एमटीडीसीने या चेतक मोहत्सवाला जागतिक पटलावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. देशातीलच नव्हे तर जगाच्या काना कोपर्यातून अश्व प्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्याची खरेदी विक्री करतात.


देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे विशेष शामियाने उभारण्यात आले आहेत. डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देतात.


भारतातले घोडे महोत्सवात दाखल


या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ, काठीयावाड, उत्तर प्रदेश तसेच राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्व शौकीन आपले घोडे येथे आणतात. अनेक अश्व प्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी यासाठी आपले अश्व या यात्रते आणतात.


सुरक्षित वातावरण, उज्वल परंपरा आणि घोडी खरेदीसाठी येणाऱ्या चाहत्याची सख्या येथे मोठी असल्याने अश्व व्यापारीही या यात्रेत हिरहिरीने सहभाग नोंदवतात.