मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भाजप नेते नारायण राणे यांची घरी जात भेट घेतली. या भेटीनंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. शिंदे सरकारचा कोणता निर्णय आवडला असेल तर तो म्हणजे मागील सरकारला घरी बसवण्याचा निर्णय आवडला असल्याचं राणे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे यांनी लगावलेल्या टोल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काँग्रेसचा नेता फुटणार आहे का?, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना, काँग्रेसबद्दल मी बोलत नाही, कारण त्यांची जी फरफट सुरू आहे ती आपण पाहत आहे. कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.


भेटीमध्ये काय चर्चा झाल्या? 
भेटीमध्ये सामान्य जनतेसाठी काय करता येईल, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकवेळी राजकीय चर्चा होत नाही, आपण काही राजकीय चर्चा करतही नाही असं एकनाथ शिंदे राणेंकडे पाहत म्हणाले त्यावेळी राणेंनीही, आपण करतपण नाही, असं राणे मिश्किलपणे हसत हसत म्हणाले. 


भाजप हे काँग्रेस छोडोची  मोहिम आखत आहे का?, असा सवाल राणेंना करण्यात आला. यावर, भाजप हे मोहिम नाही करत, भाजप हे कृती करत असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.