Narayan Rane in Khupte Tithe Gupte : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' याचं तिसरं पर्व आता येत्या 4 जूनपासून सुरू झालंय. झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह इतर दिग्ग्जांनी हजेरी लावली होती. अशातच खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हजेरी लावली. त्यावेळी नारायण राणे यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवधूत गुप्ते यांनी नारायण राणे यांना बोचरे प्रश्न विचारले. त्यावर नारायण राणे यांनी आपल्या शैलीत उत्तरं दिली. आमदार उचलून आणणं, सरकार पाडणं यात तुमची त्यावेळी मास्टरी झालेली होती. आता हाच प्रकार उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) झालाय. जर आता तुम्ही शिवसेनेत असता तर असं झालं नसतं? तुम्ही त्यासाठी काय केलं असतं? असा सवाल अवधूत गुप्तेने (Avadhut Gupte) नारायण राणे यांना विचारला. 


आणखी वाचा - भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' किस्सा अन्... पाहा Video


त्यावर, मी शिवसेनेत असतो तर त्यांची वाईट अवस्थाही झाली नसती. 40 सोडा... एक आमदार इकडचा तिकडं जाऊ शकत नव्हता, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. त्यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला. मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलं, असं नारायण राणे (Narayan Rane On Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरे घर सोडून हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मात्र, बाळासाहेबांना तयार केलं आणि मी स्वत: उद्धव ठाकरे यांना घेऊन आलो, असं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं आहे. ते बाळासाहेबांना एकच धमकी द्यायचे, घर सोडायची, असंही नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे. नारायण राणे यावेळी संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील तोफ डागली.


पाहा Video



दरम्यान, नारायण राणे पोपटासारखं बोलतं असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याची क्लिप कार्यकर्मात चालवण्यात आली. त्यावेळी नारायण राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. हे माझं पाप आहे, संजय राऊत यांना खासदार मी केला. तेव्हा खासदार झाले नसते, नाहीतर ते कधीच झाले नसते, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.