रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच रत्नागिरीत नारायण राणे समर्थक सक्रीय झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या राजकीय वाटचालीसाठी राणे समर्थकांनी गाऱ्हाणे घातले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाची घोषणा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी राणे समर्थकांनी रत्नागिरीत बारा वाड्यांचे ग्राममंदिर भैरी देवाला साकडे घातले. पक्षाची वाटचाल आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीपर्यत सर्वच निवडणुकीत यश दे यासाठी हे गा-हाणे घालण्यात आले. महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेची पताका राज्यात फडकू दे असं गाऱ्हाणे यावेळी घालण्यात आले.


काँग्रेसला रामराम ठोकून राणेच्या सोबत आलेले कार्यकर्ते आणि स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते या गा-हाण्याच्यावेळी उपस्थित होते. नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर सिंधुदूर्ग नंतर रत्नागिरीतही राणे समर्थक जोमात सक्रीय होताना पाहायला मिळतात.