कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १७ सप्टेंबरला नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कणकवलीत येत आहे. रखडलेल्या राणेंच्या भाजप प्रवेशाच्या पर्शवभूमीवर या महाजनादेश यात्रेचे महत्व वाढले आहे. कोकणात मुख्यमंत्री येणार असल्याने राणेंची भूमिका काय रहाणार? राणेंचा भाजप प्रवेश १७ सप्टेंबरपूर्वी होणार की १७ लाच सिंधुदुर्गमध्ये होईल, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं विचारले जात आहेत. 


१७ ला दुपारी दीड वाजता कणकवलीत मुख्यमंत्र्याची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने भाजप कडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राणेंनी एकूणच भूमिका मात्र सावध असल्याचं दिसतंय कोणतीही प्रतिक्रिया राणे कुटुंबियांकडून देण्यास नकार देण्यात आलाय त्यामुळे या दोऱ्याच महत्व वाढले आहे.