नवी मुंबई : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) बंद पुकारला आहे. नरेंद्र पाटील (Narendra Patil )यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून (Annasaheb Patil Economic Development Corporation) हकालपट्टी करण्यात आल्याने माथाडी कामगार यांनी हा बंद पुकारला. दरम्यान, मार्केट बंद करु नका, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदा बटाटा, मसाला आणि दाना (onion-potato-spice market closed) या तीन मार्केटमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एपीएमसी बंद केल्याने व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. दरम्यान, भाजीपाला आणि फळ मार्केट मात्र सुरू  आहे. 



आधीच कोरोनामुळे व्यावसायावर परिणाम होत असताना परत मार्केट बंद केल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. सरकार विरोधी वारंवार भूमिका घेतल्या गेल्याने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून नरेंद्र पाटील यांच्यासह आठ संचालकांची पदे सरकारने बरखास्त केली आहे. त्याविरोधात माथाडी कामगार आक्रमक झालेत. मार्केट बंद करु नका. दिवाळी आहे. व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान करु नका. मला पाठिंबा दिला आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे. मात्र, कोणाचे नुकसान होईल, असे काहीही करु नका, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली.


 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमातील नियम 82(4) मधील तरतुदीनुसार महामंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या शासनामार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र महामंडळामार्फत सुरु असलेल्या योजना निरंतर सुरु राहतील, या योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढे देखील निरंतर देण्यात येईल, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. 


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील तर उपाध्यक्ष पदावर संजय पवार यांची नियुक्ती शासन निर्णय ३० ऑगस्ट, २०१८  अन्वये करण्यात आली होती. तसेच शासन निर्णय दि. २०  सप्टेंबर, २०१९ अन्वये महामंडळामध्ये संचालकांची नियुक्ती केली होती. 


महामंडळाच्या योजनांतर्गत १९००० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत विविध व्यवसायांसाठी १२१५  कोटींचे कर्ज वितरीत केले आहे व या सर्व लाभार्थ्यांना महामंडळामार्फत ६१ कोटींची व्याज रक्कम लाभार्थ्यांच्या बचतखात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.


6\