मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधात युतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. त्यानुसार उदयनराजेंशी दोन हात करण्यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्यात येईल. यासाठी नरेंद्र पाटील आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील. गेल्या निवडणुकीत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती होती. त्यावेळी शिवसेनेने आपल्या कोट्यातील हा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या रिपाईसाठी सोडला होता. मात्र, रिपाईला एकही जागा न देण्याचे ठरल्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आला आहे. सुरुवातीला नरेंद्र पाटील भाजपच्या तिकीटावरून याठिकाणी लढतील अशीही चर्चा होती. मात्र, शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेला जनसंपर्क आणि शिवसेना-भाजप युतीची ताकद यामुळे नरेंद्र पाटील उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण करू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची पहिली यादी जाहीर; अडवाणींचा पत्ता कट


तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध असूनही शरद पवार यांनी हमखास निवडून येण्याची खात्री असल्यामुळे उदयनराजे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊ केली होती. केवळ उदयनराजे यांनी अन्य मतदारसंघातही प्रचारासाठी यावे, अशी माफक अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली होती. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा बराच दबदबा आहे. त्यामुळे उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील लढत अत्यंत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. 


भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम