नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजीमधील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर : इचलकरंजीमधील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आवारात आत्मदहन केल्यानंतर नरेश भोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी रात्री उशिरा भोरे यांचा मृतदेह नगरपालिकेच्या आवारात आणला आणि संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिका कारवाई करायला दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यानी स्वत:ला पेटवून घेतले होते. ते ७० टक्क्यांहून अधिक भाजले होते. उपचार सुरू असतानाच भोरे याचा मृत्यु झाला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भोरे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर तात्काळ मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
इचलकरंजी शहरात कचरा उठावचा ठेका असणाऱ्या मे आराध्या इंटरप्रयजेसच्या कर्मचाऱ्यांने गेल्या आठवड्यात शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुकर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले होते. या विरोधात आजाव उठवीत सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी गाडीला मृत डुकर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.
याबाबत रितसर इचलकरंजी नगरपालिकेला अर्ज करून देखील प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचं नरेश भोरे याच म्हणणे होते. त्यातूनच त्यांनी थेट आत्मदहन करणार असल्याचा इशारा देवून थेट अंगावर पेट्रोल ओतून घेवून आत्महदहान केले. पण इचलकरंजी नागरपाकिलेंच्या मुख्याधिकारी यांनी मात्र, हात झटकत आपण संबधीत कंपनीला नोटीस बजावली असल्याचं स्पष्ट केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे हे इचलकरंजीमधील अनेक प्रश्नावर आवाज उठवीत होते. यातून त्यांनी अनेक तक्रारी इचलकरंजी नागरपालिकेकड केल्या होत्या असे भोरे यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र असे असताना प्रशासन फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न होते. त्यामुळे भोरे याचा बळी गेला.