Nashik Accident News : नाशिकमध्ये विचित्र अपघात विचित्र अपघात घडला आहे. एक मद्यपी कार  चालकाने थेट घराला धडक दिली. कार भिंत फोडून थेट घरात घुसली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात हा अपघात घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इसमाने भरधाव वेगाने कार चालवत परिसरात असलेल्या एका घराच्या भिंतीला कारने धडक दिली.  कारच घरात घुसली आहे. यावेळी घरात झो झोपेलेल्या तिघांच्या अंगावरपुन ही कार गेली. यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  विशेष म्हणजे या अपघातात एका सहा वर्ष मुलीचा देखील समावेश आहे.  यात ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सुरेश कृष्णा भदाणे , कलाबाई सुरेश भदाणे, पृथ्वी सुरज सूर्यवंशी वय वर्ष 6 हे अशी जखमींची नावे आहेत. सध्या यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक जगदीश धर्माळे याला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. 


दोन एसटी बसची समोरासमोर धडक, 17 प्रवासी जखमी


दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक होऊन 17 प्रवासी जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात आज दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात घडला. कर्नाटक आणि आणि देगलुर आगाराच्या बस समोरासमोर धडकल्या असून यात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटक महामंडळाची बस देगलुर वरून नांदेडकडे येत होती तर बिलोली आगाराची बस देगलुर कडे जात होती. दोन्ही बस देगलुर शहराजवळ आल्या असताना एका वळणावर समोरासमोर धडकल्या. पाऊस चालू असल्याने अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बसच्या केबिन एकमेकांत घुसल्याने दोन्ही बसचे चालक याता गंभीर जखमी झाले. दोन चालकासह एकूण 17 प्रवासी या अपघातात जखमी झाले. जखमींवर देगलुर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून गंभीर जखमी चालकाला नांदेडला हलवण्यात आले आहे. बसची समोरासमोर धडक झाल्याने काही काल इथे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.