बुलेटप्रूफ जॅकेट बनवणारा बनवतोय पीपी किट
नाशिक परिसरातील अंबडच्या एका कंपनीत या पीपी किट उत्पादनाबाबत कसोशीचे प्रयत्न सुरू
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : सध्या देशात कोरोना संसर्गापासून प्रतिबंध करणारे पीपी किटचा प्रचंड तुटवडा आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय सैन्यदलाचे बुलेट प्रुफ जॅकेट बनविणाऱ्या कंपनीने चक्क कोरोना पीपी किट बनवण्यास सुरुवात केलीये. नाशिक परिसरातील अंबडच्या एका कंपनीत या पीपी किट उत्पादनाबाबत कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकचा अंबड परिसरात अमोल चौधरी विविध प्रकारचे गणवे सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते. मात्र कोणाचं संकट देशावर आल्यापासून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय तज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोणाची बाधा होतेय.
परिणामी देशभरात पीपी किड्स ची मागणी वाढलीये. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या सॉफ्ट स्टीच कंपनीत दररोज २००० पीपी किट्स उत्पादन सुरू केले. गेल्या महिनाभरापासून त्यांनी सरकारच्या सर्व नियमावली मागून त्या पद्धतीचा कापड मागून घेतला हा हा वैशिष्ट्यपूर्ण कापड बाजारात सध्या महागाने मिळतोय.
वाहतूक बंद रेल्वे बंद आणि आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही बंद असताना त्यांनी हा कापड शोधून काढला .
आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणारी यंत्रणा म्हणून कामगार विभागाकडून कारखाना सुरू करण्याबाबत परमिशन मागितली . मात्र या ठिकाणी काम करण्यासाठी केवळ पाचच जणांना परवानगी देण्यात आली.
त्या परिस्थितीत दोन शिफ्टमध्ये ड्युटी करत त्यांनी दिवस-रात्र आपले काम सुरू ठेवलेय. अंबड बसाती सध्या औषध बनवणाऱ्या कारखान्यात सोबत फक्त केवळ त्यांचा कारखाना आता सुरू आहे.
मात्र हे काम करताना त्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. कामगारांना घरापर्यंत पोहोचणे त्यांना परत कामावर आणणे, पोलिसांच्या नाकाबंदीतुन प्रवेश मिळवून डिस्पॅच करणे अशा अनेक सरकारी लालफितीच्या कारभाराचा फटका त्यांना बसतोय.