नाशिकमध्येही भाजपा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त, मनसे विजयी
या निवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले यांनी 7453 मतं मिळवत भाजपच्या विजया लोणारी आणि सेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी पराभूत केलयं.
नाशिक : अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवलाय.यात काँग्रेसचे उमेदवार विशाल कोतकर साढे चारशे मतांनी वजयी झाले आहे. तर भाजपाचे उमेदवार महेश सोले यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहिर झालेत. यामध्येही भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले यांनी 7453 मतं मिळवत भाजपच्या विजया लोणारी आणि सेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी पराभूत केलयं. अशा निकालामुळे भाजपाचा विजयी मेरू रोखण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालेले दिसत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत
वांद्रे येथे झालेल्या भाजपाच्या जाहीर मेळाव्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा नसून डल्ला मोर्चा असल्याचे वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मनसेच्या सुरेखा भोसले यांचं निधन झाल्यामुळे ही निवडणुक घेण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेच्या उमेदवाराला मदत केली. त्यामुळे एकीची ताकत काय असते हे नाशिककरांना यातून पाहायला मिळालं आहे. असा खोचक टोला मनसेच्या विजयी उमेद्वार वैशाली भोसले यांनी भाजपाला लगावलाये.