तुकाराम मुंडेचा नाशिकमध्ये पुन्हा एकदा दणका
परिसरात अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण करणार्यांना ३१ मे पर्यंत शेवटचा इशारा दिला आहे .
योगेश खरे झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालीकेच्या परिसरात अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण करणार्यांना ३१ मे पर्यंत शेवटचा इशारा दिला आहे . ही बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा १ जूनपासून तोडण्याची धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाये. राजकीय पदाधिका-यांच्या आशीर्वादानं नाशिकचं प्रसिध्द किनारा अनधिकृत हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरु होतं.. यासारख्या इतरही बांधकामाबाबत सर्वच अधिका-यांनी देखील मौन बाळगलं होतं.. सर्वसामान्याना दंड आणि अशा मोठमोठ्या बांधकामांना मात्र अभय देणाऱ्या अधिका-यांचा हा कमाईचा मार्ग होता. मात्र आयुक्त मुंढे यांनी कुणाचीही तमा न बाळगता हे हॉटेल जमिनदोस्त केलंय.अनधीकृत बांधकाम बांधणा-यांना जणू ही तंबीच होती.
व्यवसायिकांची मुजोरी नियंत्रणात
येत्या ३० तारखेपर्यंत बांधकाम व्यवसायीकांना आपली नियमबाह्य बांधकामं महापालीकेत दंड भरुन अधिकृत करुन घ्यावीत अन्यथा कारवाईला सज्ज रहावे असा इशारा मुंडेंनी दिलाय. आता नाशिककरांनीही सजग होऊन आपल्या परिसरातील अनधिकृत बांधकामांची माहिती आयुक्तांना देणं गरजेचं आहे... यामुळे बांधकाम व्यवसायिकांची मुजोरी नियंत्रणात होण्यास मदत होईलच शिवाय शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासही मदत होईल..