चुंबक मॅन गूढ जगासमोर येणार? तपासणीसाठी आरोग्य पथक दाखल
नाशिकमधील चुंबक मॅनच्या घरी आरोग्य पथक दाखल
योगेश खरे झी मीडिया नाशिक: लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आलं. ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीच्या शरीराला सर्व वस्तू चिकटू लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आणि झी 24 तासनं या व्हिडीओमागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिकमधील या व्यक्तीच्या घरी नुकतंच आरोग्य पथक पोहोचलं आहे. हा सगळा प्रकार पाहून अंधश्रद्धा निर्मूल समितीचे सदस्य आणि आरोग्य विभागही दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे.
काय म्हणाले राजेश टोपे
लस घेतल्यावर चुंबकीय ऊर्जा निर्माण झाली असेल तर तो दावा ग्राह्य धरू शकत नाही, असे नाशिकचे सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे. पण वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य चक्रावले
कोव्हिशिल्ड लस घेतक्यावर अरविंद सोनार यांच्या शरीरारात चुंबकत्व निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा समितीने तातडीने पाहणी केली. याबाबत कुठलीही अंधश्रद्धा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. कुठलेही गैरसमज न ठेवता यामागील वैज्ञानिक कारण शोधावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत गैरसमज न ठेवता यामागचे नक्की वैज्ञानिक कारण काय असेल ते शोधले पाहिजे, असे म्हटलं आहे.