Nashik Crime: पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती (Nashik Crime) वाढू लागली असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये अशाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. एका भोंदूबाबानं चक्क महिलेवर तीन वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही व्यक्ती गेली तीन वर्ष एका महिलेचा लैंगिक छळ (Molestation) करत होता, आपल्याला जादूदोणा येतो, अंगात देवी संचारते असं खोटं सांगून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या महिलेनं गुन्हा दाखल केला आहे. वाईट बाब म्हणजे या कृत्यात काही महिला असण्याचाही संशय आहे. या प्रकारानं नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. नक्की हा काय प्रकार घडलाय जाणून घेऊया. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न (Bhondu Baba) पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Nashik Crime : Fake Bhondu Baba Abuses a Women in Nashik Some Womens also involved in this crime)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घडल्या प्रकारात या महिलेला या भोंदूबाबानं तूला घर मिळवून देऊ म्हणून मोठ्या आलिशान घराचे आमिष दाखवले आणि मग तिच्याकडून पैसे उकळले आहेत. त्यानंतर आपल्याला जादूतोणा येत असून आपल्या अंगात देवी संचारते असं  खोटं सांगून तिच्यावर सलग तीन वर्षे लैगिंक अत्याचार केले आहेत. नाशिक रोड परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. नाशिकमध्ये सध्या महिलांवरती अत्याचारांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात सध्या घडलेल्या या घटनेनं सगळीकडेच खळबळ उडाली आहे. विष्णु काशिनाथ वारूंगसे उर्फ देवबाबा असे महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. या भोंदूबाबासोबतच सुनिता विष्णू वारूगसे, उमेश विष्णू वारूंगसे, वैशाली विष्णू वारूगसे अशी इतर संशयितांची नावे आहेत. याबद्दल महिलेनं उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


काय घडला नक्की प्रकार? 


नाशिक शहरात उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारा हा भोंदूबाबा एप्रिल 2018 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत या पाडित महिलेवर अत्याचार करत होता. त्याचबरोबर आपला हा गुन्हा लपवण्यासाठी हा भोंदूबाबा महिलेला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता. 


हेही वाचा - Shocking News: जिम ट्रेनर अचानक जमिनीवर कोसळला अन् नंतर उठलाच नाही...


नाशिक शहरात भोंदूबाबांचा उत्छाद? 


नाशिक शहरात अशा प्रकारे भोंदूबाबांचे प्रस्थान आहे. या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीला अनेक लोकं बळी पडत आहेत. त्याचबरोबर असा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी (police) एका आईसह मुलीवर एका भोंदूबाबाच्या भाेंदूगिरीला बळी पडल्या आहेत. येवला तालुक्यात मुलीचं लग्न जमत नव्हतं म्हणून त्या याच भोंदूबाबाकडे गेल्या होत्या त्यानंतर त्यांनी भोंदूबाबावर कारवाई केली आहे. वाढत्या घटनांमुळे भोंदूबाबांवर जादूदोणा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे.