Crime News : श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असताना  नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आश्रमातील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांचा मोठा ताफा आश्रमात दाखल झाला आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना 


नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) रोडवर अंजनेरी परिसरात आधारतीर्थ हा आश्रम (Aadhartirth Aashram)  सुरू करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यभरातील मुला आणि मुलींचा सांभाळ या आश्रमात करण्यात येतो. आणि याच आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याची माहिती समोर आली. आलोक विशाल शिंगारे (Alok Vishal Singare) (वय 4 रा. उल्हासनगर)  असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आधारतीर्थ आश्रमात त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. या आश्रमातील एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 


आश्रमाच्या मागे आढळला मुलाचा मृतदेह 


आलोक हा मृतावस्थेत आढळल्यानंतर तातडीने त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तो मृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, आलोकची हत्या झाली आहे. गळा दाबून त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे आश्रमासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी काय तपास करतात आणि तपासात काय उघड होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


वाचा : आरोपी आफताब आपल्या कुटुंबियांना भेटणार, कोर्टाने दिली परवानगी


नववीच्या वर्गातील मुलाबरोबर भांडण


नववीच्या वर्गातील एका मुलाशी हत्या झालेल्या मुलाचे भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या हत्येचा भांडणाशी काही संबंध आहे का ? याची देखील कसून चौकशी सुरु आहे. दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले होते ही माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. 


आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीचा आधारतीर्थ आश्रम म्हणून ओळखला जातो. राज्यभरातील अनेक मुले मुली आश्रमात राहतात. राज्यातील ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे, अशा राज्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या आश्रमात राहतात.