Crime News : गेल्या काही वर्षात वाढत्या तंत्रज्ञानासोबत सायबर गुन्ह्यांमध्येही (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तंत्रज्ञानात साक्षर नसणाऱ्यांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. अशातच नाशकात पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात (Nashik Police) धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गावाकडे राहणाऱ्या काकांचा पुतण्याने मोबाईल हॅक करुन डेटाची चोरी केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी काकाने पुतण्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ईमेल अकाऊंट काढून देण्याच्या बहाण्याने पुतण्याचे काकाच्या मोबाईला अॅक्सेस मिळवला होता. त्यानंतर पुतण्याने काकाच्या मोबाईलमधील डेटाची चोरी केली होता. काकाला हा सगळा प्रकार कळताच त्याला धक्का बसला. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि गुन्हा दाखल केला.                     


दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (37, रा. उत्तमनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. तर उमेश मधुसुदन कुलकर्णी (वय 56, रा. चाळीसगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे. उमेश कुलकर्णी यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दीपकने उमेश यांच्या मोबाईलमध्ये ईमेल सुरु करुन देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली आहे. त्यानंतर डेटाची चोरी करुन तो डिलीट केला.


उमेश कुलकर्णी हे चाळीसगावात पौराहित्य करतात. पुतण्या दीपक याने 13 ऑगस्ट 2023 रोजी उमेश यांचे दोन मोबाइल हॅक केले. त्यानंतर दीपक याने उमेश यांच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकासह वैयक्तिक फोटो, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाचा डेटा डिलिट केला. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर उमेश यांनी पुतण्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


कसा केला हॅक?


उमेश कुलकर्णी यांना त्यांच्या मोबाइलमध्ये काही महिन्यांपूर्वी ई-मेल अकाऊंट सुरू करायचे होते. त्यावेळी त्यांनी दीपकची मदत घेतली. दीपकने काकांना ई-मेल सुरू करून देताना तिथे टू-स्टेप व्हिरिफिकेशन करताना स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. त्यामुळे दीपकला उमेश कुलकर्णी यांच्या मोबाईलचा अॅक्सेस ई-मेलच्या माध्यमातून मिळाला. 


फिर्यादी हे त्यांच्या मोबाइलमध्ये संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ किंवा इतर डेटा जमा करत होते. त्यामुळे या संपूर्ण डेटाचा बॅकअप ई-मेल ड्राइव्हवर सेव्ह होत राहिला. हा डेटा दीपक स्वत:च्या मोबाईल नंबरवरून ई-मेल उघडून पाहायचा. त्यानंतर दीपकने ऑगस्टमध्ये अचानक काकांच्या दोन्ही मोबाइलमधील डेटा ई-मेलच्या माध्यमातून डिलिट केला. ही बाब उमेश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली.