सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सध्या ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन फसवणूक करुन अनेकांना लाखोंना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या (Nashik News) महाकाली चौकातील एका तरुणाला आपल्या दुचाकीचे फोटो ऑनलाइन विक्रीकरता  सोशल मीडियावर टाकणे चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने संशयिताने दुचाकी घेऊन पळ काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या महाकाली चौकात राहणाऱ्या प्रशांत जगताप यांना त्यांची दुचारी विकायची होती. प्रशांत यांनी बाईक विकण्यासाठी ऑनलाईन विक्रीचा पर्याय निवडला होता. यासाठी त्यांनी दुचाकीचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर टाकली होती. प्रशांत जगताप यांनी सोशल मीडिया व ऑनलाइन ॲपवर दुचाकीचे फोटो अपलोड केले होते. काही दिवसातच त्यांच्याकडे सात ते आठ व्यक्तींनी भेट घेऊन दुचाकी बघितली.


त्यानंतर एका अज्ञात संशयितांचा जगताप यांना फोन आला होता. अज्ञात व्यक्तीसोबत बोलणे झाल्यानंतर जगताप यांनी त्याला शुभम पार्क जवळील एका ज्वेलर्स दुकानाजवळ दुचाकी पाहण्यासाठी बोलवले होते. दोघांची चर्चा झाल्यानंतर, संशयिताने प्रशांत यांच्याकडे दुचाकीची ट्रायल देण्याची मागणी केली. प्रशांत यांनी विश्वासाने त्या अज्ञात व्यक्तीला दुचाकी दिली. मात्र तो ट्रायलसाठी गेलाला अज्ञात व्यक्ती पुन्हा दुचाकी घेऊन परतलाच नाही.


बराव वेळ ती व्यक्ती न आल्याने प्रशांत जगताप यांनी अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवर फोन केला. मात्र तो बंद असल्याने जगताप यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपासामध्ये एका सीसीटिव्हीमध्ये अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसत आहे.


रिक्षाच्या फ्लॅश लाईटवरून आरोपीला अटक


दरम्यान, पुण्यात वाहन चोरीसोबतच आता शहरात वाहनांच्या विविध पार्टच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी रात्रीच्या वेळी रिक्षांचे टायर आणि बॅटरीची चोरी करणार्‍या सराईताला शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तपास करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये चोरीच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिक्षाबाबत एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. चोरीसाठी वापरण्यात येत असलेल्या रिक्षामध्ये ब्रेक लावला त्या रिक्षाची फ्लॅश लाईट लागत होती. 


याच छोट्याश्या पुराव्यावरुन पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. शादाब युसुफ अन्सारी (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शादाबने शहरातील विविध भागात  चोऱ्या केल्या असल्याचे समोर आले असून, तो या बॅटरी व टायर विक्री करत होता. तसेच त्याचे कोणी साथीदार आहेत का याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. अटक करण्यात आलेल्या अन्सारी याच्यावर सहा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो भाडेतत्वावर रिक्षा चालवत होता. नंतर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर चोरत होता. त्याच्या रिक्षाच्या फ्लॅश लाईटवरून त्याला अटक करण्यात आली आहे.