नाशिक जिल्ह्यात शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर सांडले
शेतकऱ्यांनी या गाड्या आडवून ७०० ते ८०० लीटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतत निषेध व्यक्त केला.
नाशिक : निफाड तालुक्यातील टाकळी फाटा येथील संतप्त शेतकऱ्यांनी निफाड चांदवड-मनमाड त्रिफुली इथं रात्री दुधाच्या पिशव्या असलेल्या गाड्या आडवल्या.
या गाड्या नाशिकहून मुंबईकडे चालल्या होत्या. शेतकऱ्यांनी या गाड्या आडवून ७०० ते ८०० लीटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतत निषेध व्यक्त केला.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर येवला-कोपरगाव रस्त्यावर आंब्यांची नासाडी करण्यात आली आहे.