Leopard Attack  : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांची वाढ होताना दिसत आहे, त्यात नाशिक जिल्ह्यात (Nashik News) बिबट्याचा हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना आणि त्याचा बातम्या आता तर रोजचंच होऊन बसलं आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे, वेळुंजे गावातील दिवटे वस्तीवर एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात त्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्य झाला आहे. एकूणच सर्व प्रकाराने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. (leopard attack in nashik hosrible)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यातील  निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी या परिसरात बिबट्याचा वावर गेले काही दिवसात खूप वाढला आहे. या आधीसुद्धा बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा  लागला होता. 


जुलै महिन्यात नाशकातील धुमोडी परिसरात बिबट्याने ८ वर्षीय चिमुरडीला आपलं शिकार बनवलं होत. आणि आता याच परिसराजवळ असणाऱ्या दिवटे वस्तीवर बिबट्याने आपला मोर्चा वळवला.


हरीश निवृत्ती दिवटे असं या हल्ल्यात जीव गमावलेल्या बालकाचं नाव आहे.  वेळुंजे गावानजीक अवघ्या ४-५ घरांची दिवटे वस्ती आहे साधारण संध्याकाळच्या सुमारास जेव्हा हा बालक घराजवळ खेळत होता


तेव्हा अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं. माहिती मिळताच वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले २ तास अथक प्रयत्न केल्यानंतर खेर मुलाचा मृतदेह शोधण्यात आला. 


या आधीसुद्धा बिबट्याच्या हल्ल्याच्या बरीच घटना घडल्या आहेत  


उत्तराखंडमधील भिलंगणा ब्लॉकमध्ये 13 वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच जंगलात महिलांवर बिबट्याचा हल्लाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा LIVE  थरार पाहून निशब्द व्हायला होतो. 


उत्तराखंडातील धक्कादायक घटना (Uttarakhand Shocking Video)


अल्मोडामधील द्वारहाटमध्ये बिबट्याने (Leopard) दोन महिलांवर हल्ला केला. घटनेच्या वेळी या दोघी महिला जंगलात चारा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी धानीमनी नसतानाही बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या व्हिडिओमध्ये तुम्ही हा थरार पाहून शकता. जीवाच्या आकांताने पळत सुटलेल्या महिलांना पाहून आपलाही जीव कासावीस होतो. (video Leopard Attack in two woman live viral) 


या दोन्ही महिला मल्ली मिराई गावातील आहेत. या भागातील स्थानिकांना कायम बिबट्याचा हल्ल्याची भीती असते. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील स्थानिकांना जंगलात जावं लागतं. जीव धोक्यात घालून ते हे काम करत असतात. अशात आयुष्यातील संघर्षाचं हे भयान वास्तव अंगावर काटा आणणारं आहे.