योगेश खरे / नाशिक : नाशिक महापालिकेची परिवहन सेवा दृष्टिपथात आहे. (Nashik Municipal Corporation city bus service )गेल्या चोवीस महिन्यांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित असलेली नाशिकची परिवहन सेवा आता लवकरच सुरु होण्याच्या तयारीत आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक शहरामध्ये 50 बसेस सुरु होणार आहेत. परिवहन विभागाने या सेवेला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर बस सेवा सुरु करण्याच्या  तयारीला वेगात सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक तत्वावर नाशिक शहर बस सेवा (Nashik city bus service) सुरु करुन चाचपणी घेतली जाणार आहे. त्यानंतर पूर्णक्षमतेने अडीचशे आधुनिक जीपीएस आणि सीसीटीव्हीनी सुसज्ज बसेस रस्त्यावर उतरतील. यात 200 सीएनजी बसेस तर पन्नास डिझेलवर चालणाऱ्या बसेस आहेत. या बसेससाठी झिरो ते दोन किलो मीटरला दहा रुपये तर 50 किलोमीटरपर्यंत 65 रुपये अशा प्रवासी दराच्या टप्पा निश्चित करण्यात आला आहे.


यासाठी नाशिक महापालिकेची पुढील आठवड्यात स्वतंत्र अशी बैठक घेतली जाणार आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांचा आढावा आणि इतर तयारीचा आढावा घेतला जाईल एकदा बसेस सुरु केल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्याने नाशिक महापालिकेची इतर सर्व सेवा सुविधा शहरातील बस स्थानके त्यासाठी लागणारे ॲप अशा सर्व सेवाबाबतची तयारी सुरू झाली आहे.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा यासाठी बंद करावी लागणार आहे ग्रास कॉस्ट कटिंग या प्रोसेस नुसार ही बस सेवा सुरु केली जाईल. परिवहन विभागाने टप्प्यांच्या दराला मंजुरी दिल्यानंतर महापालिकेचा बस सेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे खाजगी बस सुरू करताना दोन कंपन्यांशी करार करण्यात आला यामध्ये बस ऑपरेटर सोबतच बसची खरेदी बस संचालन व्यवस्थापन देखभाल असा दोन कंपन्यांशी दहा वर्षांचा करार करण्यात आला आहे.


महापालिकेच्या 'स्मार्ट सिटी'चा कंट्रोल रुममध्ये या सर्व बसेस वर जीपीएसच्या सहाय्याने लक्ष ठेवता येणार आहे इतकच नाही, तर नागरिकांनाही आपली बस शहरात कुठे आहे आणि तिला किती वेळ लागू शकतो, हे आपल्या मोबाईलवर बघता येईल. त्यामुळे अत्याधुनिक अशा बसेसमध्ये आता नाशिककर प्रवास करु शकतील.