नाशिक पालिका स्थायी समिती बैठकीत जोरदार गदारोळ
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनं नाशिक मनपा राज्यात चर्चेत आलीय. महापालिकेत स्थायी समितीचा कार्यकाल आज संपला. या बैठकीत जोरदार गदारोळ झाला.
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनं नाशिक मनपा राज्यात चर्चेत आलीय. महापालिकेत स्थायी समितीचा कार्यकाल आज संपला. या बैठकीत जोरदार गदारोळ झाला.
स्थायी समितीची शेवटची बैठक
स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत. गुरूवारी या सदस्यांचा अखेरचा दिवस होता. मात्र अखेरचा दिवस गाजला तो या खडाजंगीने. नाशिकच्या भंगार बाजार प्रकरणी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद आणि शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे आमनेसामने आले.
न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन
अतिक्रमण उठवलं असतानाच पुन्हा अतिक्रमण करणारे येत आहेत असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे अधिकारी आणि मनपा पथक न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याला सय्यद यांनी आक्षेप घेत रितसर परवानगीची मागणी केली त्यामुळे जोरदार खडाजंगी झाली.
बजेट सादर करण्याची संधी हुकली
या खडाजंगीनंतर या सदस्यांच्या निवृत्तीने स्थायीचा कार्यकाल आटोपला. त्यानंतर नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एकाची निवड करण्यात आली. दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत बजेट सादर करण्याची संधी हुकल्याने सभापतींनी खंत व्यक्त केली.