योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: (Nashik News) महाराष्ट्राचं महावस्त्र अशी ओळख असणाऱ्या पैठणी साडीचा वेगळाच थाट असतो. याच पैठणी साडीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला येथे देशातून अनेक मंडळी खास पैठणी खरेदीसाठी येतात. खिशाला परवडणाऱ्या दरापासून ते अवाक्याबाहेरच्या दरात मिळणाऱ्या पैठणी इथं पाहता येतात. अशा याच पैठणीच्या माहेरघरात सध्या एक अशी घटना घजली आहे, ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून राज्यातून अनेक गुन्हेगारी कृत्यांविषयीच्या बातम्या समोर आल्या. त्यातच आता नाशिकमधील घटनेनंही लक्ष वेधलं आहे, कारण घडलेली घटनाही तितकीच गंभीर आहे. नाशिकमध्येच असणाऱ्या येवल्याजवळ सर्वात महागड्या पैठणी तयार करणारं नागडे गाव आहे. हे गाव जगाच्या नकाशावर त्याच्या याच वैशिष्ट्यामुळं कमालीचं लोकप्रियही आहे. 


नाशिकमधील याच गावाच्या बायपास रोडवरील पैठणी कारखान्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या साड्या हातमागावर विणल्या जात होत्या. गेल्या वर्षभरापासून या बहुमोल पैठणीवर कामरागीर धागा धागा विणत कारागिर बहुमोल पैठणी तयार करत होते. या साड्यांवर आता फक्त अखेरचा हात फिरणं बाकी असतानाच भगवान दत्तू गायकवाड यांच्या पैठणी कारखान्यात एक विचित्र घटना घडली आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 


हेसुद्धा वाचा : Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...


 


गायकवाड यांच्या पैठणी कारखान्यात सोमवारी मध्य रात्री चोर घुसले आणि चोरांनी पैठण्या चोरल्या. मध्य रात्रीच्या सुमारास चोरांनी ब्रॉकेट पैठण्या कापून नेल्याची घटना घडली आणि घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ माजली. सदर घटनेबाबत कळतात गायकवाड यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून येवला शहर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. चोरट्यांचा तात्काळ पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी आता साडी उत्पादक आणि हातमाग कारखान्यांच्या मालकांकडून केली जात आहे.