योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : 21 व्या शतकात आजही समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. एक प्रगत राज्य अशी ओळख असण्याबरोबरच, पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ठाशीव ओळख. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचा कळस पाहिला मिळतोय. नाशिकमध्ये अंधश्रद्धेची अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.  केवळ आदिवासी लोकच नाही तर इथले शिक्षकही अंधश्रद्धेला खतपाणी घालत चित्र पाहिल मिळतंय.


नेमकी घटना काय?
 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव इथं शासकीय कन्या आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मागील आठवड्यात वृक्षारोपणाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने  या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 


पण या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखलं. कारण काय तर या मुलीला मासिक पाळी आली होती. तू झाड लावू नकोस, कारण झाड जगणार नाही, असं सांगत शिक्षकाने त्या मुलीला झाड लावू दिलं नाही. सर्व मुलींच्या समरो शिक्षकाने त्या मुलीला झाड लावण्यापासून रोखलं. 


शिक्षक बारावीच्या वर्गात शिकवतात. हा प्रकार अंधश्रध्दा खतपाणी घालण्याचा प्रकार असुन संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केलीये