COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिकमध्ये वाडा कोसळलाय. जुन्या नाशिकमधल्या जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळून ही दुर्घटना घडलीय. काही रहिवासी या वाड्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दोन रहिवाशांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अजून पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे.


वाडा धोकादायक 


नाशकातील हे वाडे पडण्याच्या स्थितीत आहेत असे वारंवार सांगण्यात येत होते. पण नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. अजूनही यामध्ये ४ ते ५ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.