नाशिक : जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची फळफळावळ, भाजीपाला होतो. मात्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालाच्या निर्यातीसाठी नाशिकला अजून कायमस्वरूपी हवाईसेवा मिळाली नाही. हवाई सेवेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. नाशिकचं हे कार्गो हब आहे. इथूनच गेल्या वर्षात हजारो मेंढ्या बकऱ्या 34 फ्लाईटनी दुबईला निर्यात करण्यात आल्या आहेत. या सर्व निर्यातीला आडकाठी आणणाऱ्यांना न्यायालयाने चपराक दिल्याने थेट नाशिक दुबई कार्गो सेवा अविरत सुरू झालीय. नाशिक ही खरंतर पर्यटननगरी. त्र्यंबकेश्वरात देशापरदेशातून लोक येतात. त्यामुळे विमानसेवा असणं महत्त्वाचं आहे. 


या निमित्ताने काही प्रश्न उभे राहिले आहेत


दुबईला निर्यातीची परवानगी असून येणाऱ्या विमानात काही आणण्याची परवानही का नाही?
मुंबईला पर्यायी विमानतळ म्हणून नाशिकचा वापर का केला जात नाही?
कृषीपूरक उद्योगांच्या मदतीसाठी नाशिक विमानतळ का वापरला जात नाही?
प्रवासी विमानसेवेसाठी अनेक जण असताना आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी का नाही?


नाशिकचा विकास गगनभरारी घेत असताना आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या पालकत्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे. हवाई सेवा अविरत कशी सुरू राहील याचे प्रयत्न गरजेचे आहेत. तसंच हवाई सेवेचा विस्तारही गरजेचा आहे. त्यामुळे सरकारने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.