किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील विविध रस्त्यांवर सध्या विविध कामांमुळे खोदकाम सुरु झालं आहे. मात्र काम झाल्यावर त्यावर डांबरीकरण करण्याचा विसर नाशिक महानगरपालिकेला पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या विविध रस्त्यांवर वेगवेगळ्या कामांसाठी खोदकामं झाली. या खोदकामांमुळे धुळीचा त्रास, छोट्या अपघातांच्या घटनांनी नाशिककर बेजार झालेत. काम झाल्यानंतर ही खोदकामं बुजवावीत एवढे साधे कष्टही पालिकेने घेतले नसल्याची तक्रार करत रस्त्याचं तातडीने काम करावं अशी मागणी नाशिककर करत आहेत.


याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता  परवानगी नसल्याने प्रतिक्रिया देऊ शकत नाही मात्र रस्त्याची परिस्थिती पाहूनच लवकरात लवकर काम करू असं आश्वासन देण्यात आलंय.


शहरात रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला अनेकदा विनापरवाना कामं केली जातात. त्यात काम झाल्यावर अशा अडचणी निर्माण होतात मात्र कारवाई कुणावर करणार आणि कुणी हे काम केलं याचा थांगपत्ताच अधिकाऱ्यांना नसल्याचं यानिमित्ताने समोर येतंय. मात्र याचा नाहक त्रास नाशिककरांना सहन करावा लागतोय. त्यामुळे वेळीच पालिका प्रशासनाने याबाबत कठोर पाऊल उचलून कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.