योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पैसे वाढावेत म्हणून आपण गुंतवणूक करतो मात्र जर योग्य ती चौकशी करून गुंतवणूक केली नाही तर नाशिककरांसारखी पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. शंभर दिवसात दाम दुप्पट, हजार दिवसात तिप्पट दाम, तुमच्या गुंतवलेल्या पैशांवर भरघोस व्याज अशा सांगण्याल्या तुम्ही भुलत असाल आणि गुंतवणूक करत असाल तर जरा जपून राहा. कारण नाशिक शहरात दर महिन्याला अशा अनेक योजना येतात ज्यामुळे नाशिकरांवर पश्चाताप करण्याची वेळ येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हायटेक बिझनेस नेटवर्क म्हणजेच एचबीएनच्या आर्थिक भुलभुलैयात नाशिककरांची फसवणूक झाल्याचं उघड झाले आहे. काहींनी गुंतवणूक केली. तर काहींनी कोणतीही चौकशी न करता थेट एजन्सीच घेतली. या योजनेत फसवणारा प्रमुख हा नाशिक सिक्युरिटी प्रेस मधला सरकारी कर्मचारी असल्याचा आरोप योजनेत फसलेल्या पीडितांनी केला आहे.


एचबीएन ग्रुपचे कार्यालय दिल्लीत स्थापन करण्यात आलं असून  महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भागातही अनेकांना फसवण्यात आले. या फसलेल्या गुंतवणूकदारांना आता न्याय देण्यासाठी एचबीएन ट्रस्ट म्हणून संस्था स्थापन करण्यात आली आहे.



मी पुण्यात बसलेलो आहे 80 हजार रुपये मध्ये यामध्ये अडकले आहेत. म्हणून आम्ही आता सर्व गुंतवणूकदारांना एकत्र करत आहोत असे ट्रस्टी संतोष निर्मलकांत यांनी सांगितले. 


याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे मात्र माध्यमांसमोर बोलणं त्यांनी टाळले आहे. काहीही असलं तरीही गुंतवणूकदारांनी कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या नादात पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये.