दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई : कोरोना काळातील अनल़ॉक प्रक्रिया सुरु होऊन या सत्रातीच चौथ्या टप्प्याची सुरुवाच होत असतानाच राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच या सरकारकडून राज्यातील पोलीस खात्यात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.  सध्याच्या घडीला विश्वास नांगरे पाटील यांच्यासह राज्यात इतरही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आल्या आहेत. राज्य सरकारकडून यासंबंधीचे आदेश काढण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून त्यांची मुंबई बदली होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. आता अधिकृत आदेश आल्यामुळं यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. 


 


विश्वास नांगरे- पाटील यांच्यासह इतर ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. ज्यामध्ये काही महत्त्वाच्या नावांचा आढावा घेतल्यास त्यांच्या वाट्याला पुन्हा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लक्षात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार काही निवडक अधिकारी आणि त्यांच्या वाट्याला आलेली नवी जबाबदारी पुढीलप्रमाणे... 


यशस्वी यादव - सह पोलीस आयुक्त, वाहतूक, पोलीस आयुक्तालय मुंबई शहर 


मधुकर पाण्डेय- विशेष पोलीस महानिरिक्षकस सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा, मुंबई 


दीपक शिवानंद पांडे - पोलीस आयुक्त, नाशिक शहर 


राजकुमार एम. व्हटकर - सह पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर 


छेरिंग दोर्जे - विशेष पोलीस महानिरिक्षक, सुधार सेवा, मुंबई 


मनोज एस. लोहया - विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर 


प्रताप आर. दिघावकर - विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 


सुहास मधुकर वारके - विशेष पोलीस महानिरिक्षक, कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई


मिलिंद भारंबे - सह पोलीस आयुक्त, गुन्हे पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर 


विश्वास नारायण नांगरे पाटील - सह पोलीस आयुक्त,  कायदा व सुव्यवस्था, पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर 


कृष्णा प्रकाश - पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड (सध्याचे अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील पद विशेष पोलीस महानिरिक्षक श्रेणीमध्ये अवनत करुन)


वरील अधिकाऱ्यांव्यतिरिक्तही काही फेरबदल करण्यात आले आहेत.