योगेश खरे, नाशिक : नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये कारागृहाच्या 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहात लाखोंची लाच घेऊन, शिक्षा वॉरंट तसेच न्यायालयीन दस्ताऐवजमध्ये खाडाखोड आणि व्हाईटनर लावून शिक्षा संपण्यापूर्वीच कैद्यांना सोडून दिले गेले होते. खातेप्रमुख यांच्या आदेशानुसार नाशिकरोड कारागृह अधीक्षक मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षा संपण्यापूर्वीच शिक्षा कमी करुन कैद्यांना सोडून देण्याचा प्रकार नाशिकच्या जेलमध्ये घडला आहे. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.