Nashik Sinnar Shirdi Accident : ट्रक - बस अपघातातील मृतांची ओळख पटली, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर
Nashik Accident News : साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे.
Nashik Sinnar Shirdi Highway Accident : साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. (Nashik Shirdi Accident) या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Maharashtra News in Marathi) अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत.
Nashik Accident: नाशिक-शिर्डी महामार्गावर साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर
अंबरनाथ येथील साईभक्तांवर काळाचा घाला घातला. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खासगी आराम बस आणि ट्रकची (Private Bus - Truck Accident News) समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या 10 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झालेत. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक आणि सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्यापैकी सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे
सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली आहे.
1. दीक्षा गोंधळी,
2. प्रतीक्षा गोंधळी,
3. श्रावण भारस्कर,
4. श्रद्धा भारस्कर,
5. नरेश उबाळे,
6. वैशाली नरेश उबाळे,
7. बालाजी कृष्णा मोहंती (चालक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
साईच्या दर्शनासाठी ठाणे, अंबरनाथ परिसरातील भाविक खासगी बसने जात होते. बसमध्ये 50 लोक होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.