नाशिक : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. खरं तर येत्या २३ डिसेंबरला ही दोन्ही विमानं उडणार होती. परंतु मुंबईच्या विमानासाठी नाशिककरांना आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. 


एक दिवस रखडली सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर २३ डिसेंबरला सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं जाणा-या विमानानं या नव्या सेवेचा शुभारंभ होणार होता. मात्र आता सकाळऐवजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकहून पुण्याच्या दिशेनं टेक ऑफ घेणाऱ्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. 


श्रेयवादाचा फटका?


त्यामुळं पहिल्याच दिवशी नाशिकहून मुंबईला जाण्याचा बेत आखणा-या प्रवाशांचा हिरमोड झालाय. शिवसेना आणि भाजप यांच्यातील श्रेयवादा फटका या उद्घाटन सोहळ्याला बसल्याची चर्चा नाशिककरांमध्ये आहे.