नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांदा भावाने इतिहास रचला आहे, नाशिकमधल्या  उमराणे बाजार समितीमध्ये दुसऱ्या दिवशीही उन्हाळी कांद्याला क्विंटलला  तेरा हजार नऊशे रुपायांचा विक्रमी भाव मिळाला आहे. सकाळी उमराणा बाजार समितीमध्ये लिलाव सुरु झाल्यावर, क्विंटलला जास्तीत जास्त साडेबारा हजार रुपये इतका भाव होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र भावात वाढ होत राहिल्यानं तेरा हजार नऊशे रुपये इतका कांद्याला ऐतिहासिक दर मिळाला. घाऊक बाजारात  कांद्याला सरासरी १३९ रुपये भाव मिळत आहे. हमाली,तोलाई, वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांचा नफा, असा खर्च लागून हाच कांदा किरकोळ बाजारात आता दिडशे रुपयांपुढे विकला जाणार असल्याचा अंदाज आहे. 


उन्हाळ कांद्याच्या या विक्रमी भावामुळे ज्यांच्याकडे कांदा साठवण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांना याचा  फायदा होत आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा कांदा  सुरवातीलाच कवडीमोल भावात विकल्यानं, वाढलेल्या दराचा सामान्य शेतकऱ्यांना फारसा लाभ होताना दिसत नाही. दुरीकडे ग्राहकांना हा कांदा आता कमालीचा रडवत आहे.