Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरंबापाडा (Kharambapada) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. दोरीच्या सहाय्याने (Woman descending into a well) विहिरीत उतरून महिला पाणी भरत आहे. गंभीर बाब म्हणजे गढूळ पाणी मिळत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे खरंबापाडा येथील विहीर कधीही आटत नाही, अशी परिस्थिती असतांना ग्रामपंचयातीच्या कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांनी विहीरीतील पाण्याचा उपसा केलाय. त्यामुळे गावासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाळमिश्रित पाणी मिळत असल्याने पोटाचे विकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन उन्हाळयात ज्या विहीरीवर पिण्याच्या पाण्याची मदार असते, त्याच विहीरीतील पाणी काढून घेतल्याने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जातेय. पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी केली जाणारी महिलांची धडपड अंगावर काटा आणणारी आहेत. 



नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालूक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, सर्वात जास्त पाऊस या तालूक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरु होताच या तालूक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागते. पेठ तालूक्यातील काहनडोळपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांची,पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा तर गर्दी होतय तर रात्रीच्या वेळेस सुध्दा महिला हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याच दृष्य सध्या पहावयास मिळत आहे.


दरम्यान, अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पहावयास मिळत असून जो पर्यंत दमदार पाऊस होत नाही तो पर्यंत नागरीकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे. लोकसभा निवडणुका संपल्या आता तरी नेत्यांना इकडं लक्ष द्या, असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. प्रशासन किंवा राजकीय नेते याकडे लक्ष देणार का हाच ज्वलंत प्रश्न आहे.