नाशिक : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ इतके शेअर केले जातात की तो आकडा पाहूनही आपण थक्क होतो. तर, काही व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली हाणामारी पाहायला मिळत आहे. (Nashik Toll Plaza)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली नाशिकमधील एका टोलनाक्यावर.  नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला आपापसात भिडल्या आणि आजुबाजूचे पाहतच राहिले. नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळेना. (Nashik women fight at toll plaza video goes viral )



टोल भरण्याच्या कारणावरून आधी वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. वाद इतका पेटेल याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. पण, नेमकं तेच झालं, प्रवासी महिला आणि टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी त्या दोघीही एकमेकींना पूर्ण ताकदीनं मारत असल्याचं लक्षात आलं. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. 


टोलनाक्यांवर अनेकदा अशा प्रकारचे वाद पाहायला मिळतात. पण, महिलांमध्ये झालेल्या या हाणामारीची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. तुम्ही टोल नाक्यांवरून जाताना असा कोणता प्रसंग पाहिलाय का? कमेंटबॉक्समध्ये कळवा.