चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक : येवला तालुक्यात गेल्यावर्षी गारपिटीनं द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान केलं. यामुळे अनेक शेतकरी खचून गेले. पण पिंपरी गावातल्या भगवान ठोंबरे या तरुण शेतकर्‍यानं द्राक्ष बाग काढून टाकली आणि संपूर्ण शेतीत भाजीपाला लावला. त्यांनी ऑगस्टमध्ये कारल्याचं पहिलं पीक घेतलं. तण व्यवस्थापनासाठी ५० हजार रुपये खर्च करून मल्चिंगचा उपयोग केला. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेण्यावर भर दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठिबक सिंचनातून पाणी आणि विद्राव्य खतं दिली. काही दिवसातच कारल्याचं अतिशय डौलदारपणे पीक उभं राहिले. या पहिल्या पिकातून त्यांना एक ते दिड लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.


केवळ 50 हजार खर्च 


काढणीनंतर आम्ही साधारण पिंपळगाव, लासलगाव, कोपरगाव, वैजापूर मार्केटला नेला जातो. कधी २०० रु. दर मिळाला कधी २५० रु. मिळाला कधी १०० रु. पण मिळाला आणि सध्या आता सणासुदीचे दिवस असल्याने १३० ते १३५ दर मिळतोय असे ठोंबरे सांगतात. हे दर पुढे वाढण्याचीही अशा त्यांना आहे. यामध्ये ठोंबरे यांचा एकूण ५० हजार खर्च आला असून त्यांना साधारण दीड लाख उत्पन्न झालंय.


शेती तोट्याची आहे, असं म्हणणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण ठोंबरेंनी घालून दिलंय.